दरवर्षी प्रमाणे गुरूवार, दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी काका आठवले विद्यार्थी वसतिगृह यांच्या वतीने तारळे व दूर्गमानवड गावांमधील चार हायस्कूलच्या इयत्ता १०वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मुलांमध्ये प्रथम व मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना श्री. अजित ओटवणकर (CEO – Fortune Procurators Pvt Ltd) व श्री. अजित मडके (Director – Bharat Auto Industries) सोबत उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मारूती पाटील व विश्वस्त श्री. माधव ठाकूर उपस्थित होते.
याप्रसंगी नुकतीच अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात भरती प्रक्रिया पूर्ण केलेला तारळे वसतिगृहाचा माजी विद्यार्थी मनोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.