पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या ‘ब्रिक्स शिखर परिषदे’मध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. भारतातून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाल्यानंतर पंतप्रधान थोड्याच वेळात जोहान्सबर्गला पोहोचतील. जिथे पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिक्स बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेतील जोहानिसबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ब्रिक्स मध्ये समाविष्ट असलेल्या देशांची कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असणार आहे.कोरोनाच्या काळामध्ये ही बैठक ऑनलाईन माध्यमातून झाली होती. आता कोरोनानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक पार पडणार आहे.त्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी सर्व देशांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी ग्रीसला भेट देणार आहेत. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच ग्रीस दौरा असेल.पीएम मोदी हे 40 वर्षात ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.यादरम्यान हे दोन्ही देश व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये सहकार्यावर चर्चा करतील.