राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ६९ व्या आवृत्तीची घोषणा संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत करण्यात आली. नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे ज्युरींद्वारे पत्रकार परिषदेत विजेत्यांची घोषणा करण्यात आली. आर. माधवनचा रॉकेट्री हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर गांधी आणि कंपनी गुजराती हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार ठरला आहे. सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमासाठी विवेक अग्निहोत्रींचा द कश्मीर फाइल्सची निवड झाली आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद साॅंसे या हिंदी सिनेमाला बेस्ट फिल्म इन फॅमिली इश्यू या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाचे लेखन प्रतिमा जोशी यांनी केले आहे. सलील कुलकर्णींचा एकदा काय झालं ह्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. निखिल महाजनला गोदावरी सिनेमासाठी सर्वोकृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. देवी श्री प्रसाद यांना पुष्पा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या पुष्पा चित्रपटासाठी देवी श्री प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.