रिलायन्स इंडस्ट्रीज वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घडामोड घडली असून कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावरुन राजीनामा दिला आहे. तसेच आता त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी ईशा अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांना या मंडळात नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.मात्र, नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
गेल्याच वर्षी आकाश अंबानी यांना भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. मुकेश अंबानी अजूनही जिओचे चेअरमन आणि रिलायन्स जिओचे मालक आहेत. तर ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या चेअरपर्सन आहेत आणि अनंत अंबानी एनर्जी हा बिझनेस सांभाळत आहेत.
मुकेश अंबानी यांनी या एजीएममध्ये असेही सांगितले की, “मागच्या १० वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने १५० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कुठल्याही कॉर्पोरेट ग्रुपकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.