रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक मोठी घोषणा केली आहे.ह्या वेळी त्यांनी जिओ एअर फायबरची घोषणा केली असून ते गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार असल्याचे जाहीर केले आहे. हे जिओ एअर फायबर ५G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल.जिओ एअर फायबरच्या येण्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, १० दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी म्हणजेच जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस आहेत, जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण जात आहे. मात्र आता जिओ एअर फायबर ही अडचण कमी करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करीत आहोत. हे जिओ एअर फायबर लाँच केल्यामुळे जिओ दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल
Tags: NULL