यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तब्बल 31 टक्के कमी पाऊस झाला आहे. प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव वाढत आहे. त्याचा थेट फटका मान्सूनला बसला असून सप्टेंबर महिन्यातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. देशात दक्षिणेकडे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात होणारा मान्सूनही कमीच होण्याची भीती आहे.जून ते ऑगस्ट पाऊस कमालीचा कमी झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे.त्यामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत.पावसाने जोर पकडला नाही, तर त्याचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.९ टक्क्यांनी पाऊस कमी झाला असून, धरणसाठा १९.५५ टक्क्यांनी कमी आहे. तसेच अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, नाशिक, धुळे, नंदूरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पावसाची स्थिती चिंताजनक आहे.
राज्यभरातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के घट झाली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर पुढच्या काळात गंभीर स्थिती उद्भवण्याचा धोका आहे.पावसाने जोर पकडला नाही तर त्याचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्यभरातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत सरासरी २० टक्के घट झाली आहे.पावसाची स्थिती अशीच राहिली तर पुढच्या काळात गंभीर स्थिती उद्भवण्याचा धोका आहे.