अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी ४.८ रिख्टर स्केलच्या भूकंपाचे झटके जाणवले. अफगाणिस्तानच्या भूकंपमापक केंद्राने याविषयी माहिती दिली. आज सकाळी ८ च्या सुमारास १७५ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्रशासनाने दिली. गेल्याच आठवड्यात १८ ऑगस्ट रोजी काबुलजवळ ४२३ किलोमीटर अंतरावर भूकंप झाला होता. त्यानंतर लगेच हा भूकंप झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.