पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हाय कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिली आहे. त्यामुळे इम्रानचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
खान यांच्यावर २०१८-२०२२ च्या कार्यकाळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.तसेच त्यांच्यावर पाच वर्षांची राजकारणात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सार्वत्रिक निवडणुकीतही ते भाग घेऊ शकणार नाहीत
तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे,जेथे इतर सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी यांना परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात.पंतप्रधान असताना इम्रान खान यांच्यावर या तोशाखान्यात ठेवलेल्या भेटवस्तू कमी किंमतीत खरेदी केल्याचा आणि नंतर नफा मिळवण्यासाठी त्या विकल्याचा आरोप होता.