द कश्मीर फाइल्स या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते अनेकदा बॉलीवूडवर टीका करतात. आता पुन्हा एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. बॉलीवूड कलाकारांना मूर्ख म्हणत आता ते अशा लोकांसोबत काम करु शकणार नसल्याने ते बॉलिवूडला रामराम ठोकणार असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.
भारतीय सिनेमा या बॉलीवूड कलाकारांमुळे पुढे जात नाही. हे मूर्ख कलाकार लेखक आणि दिग्दर्शकाला सहज वेडे ठरवतात. त्यांना वाटते की चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षकवर्ग सुद्धा मूर्ख आहेत. दुर्दैवाने चित्रपट लेखक-दिग्दर्शकामुळे नव्हे तर मूर्ख कलाकारांच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे मी या बॉलीवूडमधून मानसिक निवृत्ती घेतली आहे. पण आता हळूहळू प्रेक्षकांना चांगल्या चित्रपटांचं मूल्य कळू लागले आहे. आता एकाच प्रकारचे चित्रपट प्रेक्षक पाहणार नाहीत, एवढे ते नक्कीच सुज्ञ झाले आहेत असे अग्निहोत्रीं म्हणाले आहेत.