आशिया चषकाच्या रणसंग्रामाला उद्यापासून म्हणजे 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट प्रकारात खेळवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासह स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले जाणार आहेत.
ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशात आयोजित करण्यात आली आहे. ४ सामने पाकिस्तानात, तर ८ सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. उद्घाटनाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या संघात होणार आहे. बलाढ्य पाकिस्तानसमोर नेपाळ संघ टिकू शकेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे पालटण्याची ताकद या संघात आहे. नेपाळ संघ पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. नेपाळ विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना लाहोरमधील गदाफी स्टेडियममध्ये होणार आहे.