जी २० परिषदेपूर्वी चीनने पुन्हा कुरघोडी केली असून अरुणाचल प्रदेशावर नकाशाद्वारे दावा ठोकला आहे! यावर भारताने चोख प्रत्युत्तर देत ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून चीन नैराश्यातून असा अपप्रचार करत आहे’ असे भारताने म्हटले आहे. दरम्यान चीनने अधिकृतपणे आपला २०२३ चा मानद नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्याद्वारे चीनने पुन्हा आपली कुरघोड्या करण्याची सवय जोपासली आहे.
चीन हा हतबल झाला असून नैराश्यातून असे अपप्रचार करत आहे, उच्च सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवला तर अरुणाचलच्या नकाशावर चीनचा दावा निराधार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असून चीनचा नकाशा बेकायदेशीर आहे. असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.