अंबे जोगाई येथील तरुणीला गुंगीचे औषध पाजून आरोपी आमिर तांबोळी व इतर आरोपीनी नंतर तिला धर्म परिवर्तन करण्यास तिला भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुख्य आरोपी आमिर तांबोळी याने फिर्यादीवर दबाव टाकून व गुंगीचे औषध देऊन तिच्या वेळोवेळी बलात्कार केल्याबाबत फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संबंधित तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली असता कंपनीचा मालक आमिर तांबोळी ह्यानेच तिचा गैरफायदा घेत बळजबरीने धर्मांतर करत तिच्याशी निकाह केला असल्याची घटना समोर आली .
आमिर तांबोळी या मुख्य आरोपीस अटक झाली असून यात गुन्ह्यामध्ये त्याच्यासह अन्य ४ जण सामील असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांमधील दुसरा आरोपी एक वकील असून त्याने पुणे जिल्हा न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला असून. आज ३० ऑगस्ट रोजी सकाळी पत्रावळे न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद होणार आहे.
याबाबत काही वकिलामार्फत असे आवाहन करण्यात आले आहे की, जास्तीत जास्त जणांनी आजच्या तारखेला या सुनावणीच्या वेळेस पत्रावळे कोर्टामध्ये हजर राहून ह्या आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पाठिंबा द्यावा तरच वारंवार घडत असलेल्या लव्ह जिहादच्या अश्या घटना रोखता येतील .