भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपली पुढची मोहीम सुरु करण्यासाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर आता ISRO सूर्यामोहीम करणार आहे. ‘आदित्य एल वन’ असे या मोहिमेचे नाव असून येत्या २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी हे यान श्रीहरीकोटा येथून सूर्याकडे भरारी घेणार आहे. या मोहिमेतून सूर्याचे तापमान, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळ यांसह आणखी इतर घटकांचाही अभ्यास केला जाणार आहे.
या अभ्यासासाठी यानासोबत इतर सात वेगळे पेलोड पाठवण्यात येणार असून SUIT, SoLEXS, ASPEX, PAPA, MAG, HEL10S, VELC अशी त्यांची नवे आहेत. यातील PAPA म्हणजेच ‘प्लाज्मा अॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य’ हे पेलोड सौर ऊर्जेचा अभ्यास करण्यासाठी त्याचबरोबर सौर वारे व त्याची रचना समजून घेण्यासाठी बनवण्यात आले आहे.