आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला पाकिस्तानमधील मुल्तान येथील मैदानावर आशिया चषकाला आज दिमाखात सुरुवात झाली .पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान संघ आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.नेपाळपुढे तगड्या पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.पाकिस्तानची धुरा अनुभवी बाबर आझम याच्याकडे असेल तर नेपाळची धुरा २० वर्षीय रोहितच्या खांद्यावर असणार आहे.
नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे.पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.दरम्यान पहिल्याच सामन्यात नेपाळने कमाल केली असून पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोन विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया चषकात भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानविरोधात होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे.