उद्या १ सप्टेंबर २०२३ पासून अनेक महत्त्वाचे बदल आपल्या दैनंदिन व्यवहारात होणार आहेत. या बदलांमुळे दैनंदिन व्यवहारांसोबतच महिन्याच्या बजेटवरही परिणाम होताना दिसणार आहेत. स्वयंपाकघरापासून ते अगदी शेअर मार्केटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. यासोबतच नोकरदार वर्गासाठी एक मोठा बदल होणार आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींत मोठा दिलासा देत केंद्र सरकारने दोन दिवस अगोदर १४. २ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली होती ती अंमलात येताना बघायला मिळणार आहे.आता देशभरातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी सिलिंडरचे दर कमी झालेले दिसतील.
मार्केट रेग्युलेटर सेबीने आयपीओ बंद झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या स्टॉक्सची लिस्टिंग होण्याची वेळ मर्यादा अर्ध्यापर्यंत म्हणजेच, तीन दिवसांपर्यंत केली आहे.यापूर्वी ही वेळ मर्यादा सहा दिवसांची होती.लिस्टिंगच्या या नव्या नियमामुळे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्यांसोबतच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांनाही फायदा होणार आहे.सेबीने यासंदर्भात यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. आपल्या अधिसूचनेत सेबीने म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर येणार्या सर्व आयपीओ साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेने लागू केले जातील.