उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड हे एकदिवसीय मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विमानतळावर आज दाखल झाले आहेत. ‘महेंद्रगिरी’ या युध्दनौकेचे जलावतरण आज त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , तसेच राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर इत्यादी जण उपस्थित होते. महेंद्रगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ ए अंतर्गत असलेली ही सातवी अत्यंत तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे.याची निर्मिती मुंबईतील माजगाव गोदीत करण्यात आली आहे. महेंद्रगिरी हे नाव ओरिसा राज्यात स्थित पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून देण्यात आले आहे. ही प्रोजेक्ट १७ अ श्रेणीतील सातवी युद्धनौका आहे. यामध्ये प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. नव्याने नामकरण केलेली महेंद्रगिरी ही तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांच्या हस्ते हे जलावतरण करण्यात येईल