आशिया कप २०२३ च्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यामध्ये समोरासमोर येत आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्याची वाट दोन्ही देशातील चाहते पाहत असतात. या दोन ते तीन महिन्यात भारत आणि पाकिस्तान हे अनेकवेळा आमने सामने येणार आहेत. याची सुरूवात उद्या (दि. 2 सप्टेंबर) श्रीलंकेतील कँडी येथून होणार आहे. मात्र पहिल्याच भारत – पाकिस्तान सामन्यावर पावसाचे संकट येणार का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंकाच नाही मात्र पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.