रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा सदस्य जया वर्मा सिन्हा यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील त्या पहिल्या कार्यकारी अधिकारी आहेत! अनिल कुमार लाहोटी यांचा पदभार आता जया वर्मा सिन्हा यांच्याकडे सोपवला जाईल. सिन्हा यांच्या अध्यक्षपदाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. दरम्यान जया वर्मा सिंहा यांची नियुक्ती आजपासून म्हणजे १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रभावी असेल.
अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी असलेल्या सिन्हा या १९८८ साली भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. त्यांनी उत्तर रेल्वे, पूर्व रेल्वे आणि दक्षिण – पूर्व रेल्वेत काम केले आहे. ढाका या बांगलादेशातील ठिकाणी त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे सल्लागार म्हणूनही चार वर्ष काम केले आहे.