जेव्हा मातीत माती मिसळते, त्या मातीचे काय मोल?
मृत्यूनंतरही जीवन देणारी, माती आहे अनमोल!!
घराबाहेर उभी असलेली शववाहिनी आणि अंगणात मृत पतीचा मृतदेह! वर्षांपूर्वी केलेला संकल्प पूर्ण करण्याची ती आता वाट बघत होती. दुसरीकडे, आपली आई करत असलेल्या विद्रोहाच्या विरोधात असमंजस मुलांचा आवाज टिपेला पोचला होता – “‘माती’बरोबर आम्ही उलट-सुलट काही होऊ देणार नाही, ही पद्धत चुकीची आहे, आम्ही अंतिमसंस्कार पूर्ण करणारच.” तेव्हा पत्नीच्या मनातल्या थरथरत्या भावनांनी मौन तोडले. फक्त एक वाक्य आणि सर्वांची तोंडे बंद झाली. “देहदानाचा संकल्प माझ्या पतीचा आहे, आणि यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही.” ‘दधीची देहदान समिती’च्या वतीने आपलं काम करायला गेलेले समितीचे संयुक्त सरचिटणीस (महासचिव) डॉ. विशाल चढ्ढा सांगतात ‘अशा अत्यंत भावनिक-नाजुक क्षणांमध्ये आपल्या पतीसोबत केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पत्नी आपल्याच मुलांविरुद्ध उभी राहिली. ही साधारण भावना नसून आध्यात्मिक आहे. अशा अनेक आठवणी या ‘दधीची देहदान समिती’शी निगडित आहेत. ही सत्यघटना आहे श्री संपूर्ण-जीत- कौर आणि त्यांचे दिवंगत डॉक्टर पती यांची.
Tags: NULL