भारताची चांद्रयान मोहीम यशाशी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुढील मोहीम हाती घेतली आहे. भारताने नुकतेच सूर्यामोहिमेसाठी कूच केले असून सूर्याला गवसणी घालणारे ‘आदित्य एल वन’ रॉकेट काल सूर्याकडे झेपावले. यावरून जगभरात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे कौतुक होत असताना मात्र पाकिस्तानी लोक भारताच्या मोहिमेवर राग व्यक्त करताना दिसतायत. या मिशन संदर्भात स्थानिक माध्यमांनी पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी एकाने ‘भारत हा आपला शत्रू आहे, त्यामुळे जर ते सूर्य- चंद्र मोहीम करत असतील तर हा आपला अपमान आहे’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. यावर दुसऱ्या एका नागरिकाने हास्यास्पद प्रतिक्रिया देत म्हणाला कि; ‘हि काही कठीण मोहीम नसून आपणही एक दिवस चंद्र सूर्यावर पोहोचू!’
दरम्यात एका पाकिस्तनी नागरिकाने स्वदेशाला जागं करण्याचा प्रयत्नही केला. ‘भारत हा आपल्यापेक्षा हजारो वर्ष पुढे गेला असून त्यांच्यासोबत आपली स्पर्धा नाहीच, याउलट भारतीय लोक एका शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनवतात आणि पाकिस्तान हा शास्त्रज्ञांना माफी मागायला लावतो’ असा खरमरीत टोला त्या नागरिकाने लगावला.