भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या चांद्रयान ३ या इस्त्रोच्या मिशनमध्ये मोठा वाटा उचलणाऱ्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चांद्रयान ३ अवकाशात झेपावले त्यावेळी झालेल्या काऊंटडाऊनला त्यांचाच आवाज लाभला होता, इस्रोच्या अनेक प्रकल्पांच्या उड्डाणांच्या काऊंटडाऊनला एन. वलरमथी यांचा आवाज लाभला होता.. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तसेच चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होताच त्यांनी सहकाऱ्यांसह देशाला आनंदाची बातमी दिली होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांच्या निधनामुळे भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे.
एन वलारमथी यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता तसेच RISAT-1 या पहिल्या स्वदेशी-विकसित रडार इमेजिंग उपग्रह (RIS) आणि भारताचा प्रकल्प संचालक म्हणून काम केले होते. १५ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांना प्रतिष्ठित अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले होते . हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
शास्त्रज्ञा एन वलारमथी यांना गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकाराचा त्रास जाणवत होता. चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्या तामिळनाडूतील अरियालूर येथील आपल्या घरी गेल्या होत्या. घरी असताना त्यांना अचानक हा त्रास जाणवायला लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु हार्ट अटॅकच्या झटक्यामुळे त्यांनी आकस्मिकरित्या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह अनेकांनी एन वलारमथी यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी देखील वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.