नागपूर,ता.३. अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.
विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता सामाजिक विकृती समस्या और समाधान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि सामाजिक समरसता यावरील परिसंवादाचे आयोजन महाल येथील गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, भगीरथ महाराज, विहिंपचे केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय प्रवक्ता तसेच अखिल भारतीय समरसता अभियान प्रमुख देवजी रावत, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय समरसता गतिविधी प्रमुख श्यामप्रसाद, हिंदू बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब विधाने, मुंबई क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे, विदर्भ प्रांतमंत्री प्रशांत तितरे यांची उपस्थिती होती.
Tags: NULL