आज आशिया कप 2023 मध्ये भारताचा दुसरा सामना नेपाळशी होत आहे. सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतासाठी आज करो आणि मरो असा सामना असणार आहे. नेपळाविरोधात सामना भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागेल.
आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत नेपाळच्या फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर नेपाळची फलंदाजी ढेपाळली. नेपाळने आतापर्यंत सहा बाद 155 धावा केल्या आहेत. रविंद्र जाडेजाने तीन तर सिराजने एक विकेट घेतली.मात्र नेपाळ विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन म्हणवून घेण्याऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी चुका केलेल्या दिसून आल्या आहेत. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारताचे पारडे खरे तर जड आहे. पण भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन क्रीडाप्रेमींना घडलं. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीवर झेल सोडले. अगदी सोपे झेल सोडल्याने दोन्ही गोलंदाजांनी संताप व्यक्त केला आहे.गचाळ क्षेत्ररक्षण पाहून भारतीय समालोचकांनीही संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरही भारताच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दोन्ही संघाची टीम खालीलप्रमाणे आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.