भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानाने आपला महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.सूर्याचे अध्ययन करण्यासाठी इस्रोने पाठवलेले आदित्य एल १ यानाने पहिली कक्षा पार करून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे.
इस्रोचे अवकाशयान असणाऱ्या आदित्य एल1 याने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. मंगळवारी बेंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली.पृथ्वी प्रदक्षिणा टप्पा पार करणा-या आदित्य एल-वनने आपली दुसरी फेरी पूर्ण केली आहे. 15 लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या सूर्ययानाला वेगाची आवश्यकता आहे. त्याचदृष्टीने पृथ्वीच्या कक्षेत त्याच्या प्रदक्षिणा सुरु आहेत. 15 लाख किलोमीटरचे अंतर पार केल्यावर आदित्य यान जेव्हा सूर्यकक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्यातील सारे पेलोड्स ऑन केले जातील. थोडक्यातील त्यातील सारी यंत्र सक्रिय केली जातील आणि हे सूर्ययान सूर्याचा अभ्यास करेल.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधील Istrac/ISRO ग्राउंड स्टेशनवरुन आदित्य एल १वर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यात येत असून यानाच्या स्थितीवर सर्व शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. आदित्य यान २८२ किमी x ४० हजार २२५ किमीच्या L1 च्या नवीन कक्षामध्ये पोहोचला आहे. पुढील पाच दिवसांत, आदित्य L1 मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या कक्षेत पोहचणार आहे. १० सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता हे यान तिसऱ्या कक्षेत पोचेल .
आदित्य-L1 हे रविवारी, ३ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून PSLV द्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. सुरवातीला हे अंतराळयान २४५ किमी x २२ हजार ४५९ किमी कक्षेत पाठवण्यात आले. यात सात वेगवेगळे पेलोड आहेत, त्यातले पाच इस्रोने विकसित केले आहेत तर दोन पेलोड हे शैक्षणिक संस्थांनी इस्रोच्या सहकार्याने विकसित केले आहेत.