“वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन पश्चिम प्रांत धर्मजागरण सहप्रमुख मिलिंद वाईकर यांनी केले.ते पुढे म्हणाले,सैनिक सीमेवर भारत मातेच्या संरक्षणासाठी लढतोय म्हणून राष्ट्र व समाज सुरक्षित आहे समाजाने पूर्व सैनिकाबद्दल आदरभाव दाखवला पाहिजे तसेच माजी सैनिकांनी समाजामध्ये सक्रिय रहावे,सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे तसेच नवयुवकांना सैन्यदला मध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे.”
Tags: NULL