माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर झाली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने शिक्षिका मृणाल गांजाळे यांनी आपल्या वाटचालीबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व योगदानाबद्दल ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.5, आणि बुधवार दि.6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक वैभव पोखरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.