‘एक देश एक निवडणूक’ यावरुन देशभरात चर्चा रंगली असतानाच आता ‘इंडिया’ हा उल्लेख बदलून त्या जागी ‘भारत’ असा उल्लेख अधिकृतरित्या केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. देशात पार पडत असलेल्या जी-20 परिषदेचे निमित्त साधून केंद्राकडून मोठा बदल करण्यात आला आहे. या परिषदेच्या निमंत्रपत्रिकेवर प्रथमच ‘द-प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.परिषदेत आयोजित डिनरसाठी ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ च्या जागी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ नावाने ही निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. असे बोलले जात आहे की, संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान मोदी सरकार देशाचे नाव बदलून इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते.
मात्र इंडिया नाव हटवल्यामुळे काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. आता यावरुन काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचं नाव बदलण्याचा विचार करत असल्याचं म्हटले आहे तश्या अर्थाचे ट्विट काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी केले आहे.त्यानंतर भाजपनेही काँग्रेसवर पलटवार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विचारले की, काँग्रेसला देशाचा सन्मान व गौरवाशी संबंधित प्रत्येक विषयावर आक्षेप का आहे? भारत जोडो नावाने राजकीय पदयात्रा करणाऱ्यांना भारत माता की जय घोषणेबद्दल इतका द्वेष का आहे. यावरून हेच सिद्ध होत आहे की, काँग्रेसच्या मनात देशाप्रति तर सन्मान नाहीच पण संविधान प्रति आणि संविधानिक संस्थांप्रतीही नाहीये तसेच त्यांना केवळ एका कुटूंबाचे गुणगान करण्यात स्वारस्य आहे.