देशात पार पडत असलेल्या जी-20 परिषदेचे निमित्त साधून केंद्राकडून मोठा बदल करण्यात आला आहे. या परिषदेच्या निमंत्रपत्रिकेवर प्रथमच ‘द-प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या परिषदेत आयोजित डिनरसाठी ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ च्या जागी ‘प्रेसिडेंटऑफ भारत’ नावाने ही निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत. यावरून देशभरात सध्या भारत आणि इंडिया या नावांवरून वाद सुरू असतानाच .बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी भारत माता की जय असे म्हटले आहे. ‘भारत माता की जय’! त्याचसोबत अमिताभ बच्चन यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा साईनही पोस्ट करत भारत या नावाला उघडउघड पाठिंबा दर्शवला असल्याचे समोर येत आहे. या ट्विटला अवघ्या 30 मिनिटांत 7 हजार लाइक्स मिळाले. आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचाही वर्षाव होत आहे.