20 व्या ‘आसियान भारत’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियामधील जकार्ता येथे पोहोचले आहेत. तेथे त्यांचे भारतीय नागरिकांनी जोरदार स्वागत केले .यावेळी उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम आणि मोदी मोदी च्या घोषणा दिल्या. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर गेले आहेत.
पंतप्रधान 20 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला इंडोनेशिया आसियानचे विद्यमान अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. जकार्ता इन्व्हेंशन सेंटर मध्ये पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, यावर्षीची थीम आसियान मॅटर्स: विकासाचा केंद्रबिंदू अशी आहे.आसियान महत्त्वाचे आहे कारण येथे प्रत्येकाचा आवाज ऐकला जातो आणि आसियान हे निश्चितच विकासाचे केंद्र आहे कारण जागतिक विकासात आसियानची भूमिका महत्त्वाची आहे. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला आणि तो एक व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या रूपात आता समोर येत आहे. आमची भागीदारी आता चौथ्या दशकात पोचली आहे. या शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.