देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर आता आदित्य L-1 उपग्रहाने पहिला सेल्फी इस्रोला पाठवला आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या १२५ दिवसांच्या प्रवासातील हा पहिलाच फोटो अपडेट केला आहे. आदित्यने पाठवलेल्या सेल्फीमधून पृथ्वी व चंद्राचेही फोटो पाहायला मिळत आहेत. ISRO ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून हा सुंदर क्षण सर्वांबरोबर शेअर केला आहे.
‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी २ सप्टेंबरला आदित्य एल- १ चे आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते.त्यानंतर 24 तासांतच आदित्य L-1 ची कक्षा पहिल्यांदा वाढवण्यात आली.आता आदित्य L-1 पृथ्वीपासून 40 हजार 225 किलोमीटवर पोहोचले आहे. त्यानंतर आज पहाटे पावणेतीन वाजता आदित्य L-1 ची कक्षा वाढण्यात आली आहे. आता 10 सप्टेंबरला तिसरा थ्रस्टर फायर करून आदित्य L-1 च्या कक्षेत तिसऱ्यांदा वाढ केली जाणार आहे. आदित्य L-1 एकूण 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार असून पाचवेळी थ्रस्टर फायर करून कक्षा वाढवणार आहे.
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो. अवघ्या ४०० कोटींच्या बजेटमध्ये सौर मोहीम राबवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.