मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे स्वागत करत त्यात काही बदल अपेक्षित असल्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी सरकारला दिल्या होत्या. अद्याप जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. यावेळी त्यांनी मराठा तरुणांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. ‘आत्महत्येसारखे टोकाचे पॉल उचलू नका’; अशी विनंती त्यांनी केली आहे.
जरांगे यांचे शिष्टमंडळ येत्या २ दिवसात सरकारकडे जाणार असून अध्यादेशातील बदलावर चर्चा होणार आहे.