जगात जसे मेड इन जपान, मेड इन जर्मनी अशी उत्पादने त्यांच्या गुणवत्तेमुळे प्रसिद्ध आहेत तसेच आपल्या देशाची ओळख जगभरात निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी तरुणांना केले. यावेळी ‘मेड बाय इंडियन्स’ अशी आपली ओळख निर्माण करण्यासाठी यशस्वी वाटचाल करण्याचे प्रोत्साहन राज्यपालांनी तरुणांना दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन आणि परदेशात रोजगार प्राप्त आयटीआयमधील ५८ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते.