इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे आसियान-भारत शिखर परिषद पार पडत आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ सूची प्रस्ताव सादर केला. २०व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि १८व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १हा प्रस्ताव सादर केला आहे. आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली.
संपर्क व्यवस्था, डिजिटल परिवर्तन, व्यापार आणि आर्थिक संलग्नता, समकालीन आव्हानांवर उपाय, लोकांचा थेट संपर्क आणि धोरणात्मक प्रतिबद्धता वाढवणे यांचा या सूचित समावेश आहे.