अभिनेते जी मारीमुथू यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मित निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे! दरम्यान मरिमुथू यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘जेलर’ चित्रपटात काम केले आहे.
इथर्नीचल’या टीव्ही शोचे डबिंग करताना जी मारीमुथू हे कोसळली. त्यावेळी जी मारीमुथू यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ‘जेलर’ आणि ‘रेड सँडलवुड’ या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. मारीमुथू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.