आपल्या अप्रतिम गाण्यांनी आणि चिरतरुण आवाजाने तमाम भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांचा आज जन्मदिवस, मेलडी क्वीन आशाताई आज आपला ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत.आपल्या आवाजाने हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन महान गायकांमध्ये केली जाते.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. वयाच्या १० व्या वर्षी आशा भोसली यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं.गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची कन्या आशा यांनी चित्रपट अल्बममधून जवळपास 16 हजार गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी 1948 मध्ये सावन आया चुनारिया या चित्रपटात पहिले गाणे गायले होते.त्यानंतर आशा भोसले यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत,भावगीतं चित्रपट गीत, लावणी, गझल आणि पॉप अश्या सर्व संगीत प्रकारांना आशाताईंनी आपल्या जादुई आवाजाने स्पर्श केला आणि जगभरात त्यांचे चाहता वर्ग तयार झाला.
आशा ताईना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे सन 2000 मध्ये भारत सरकारने आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच 2008 मध्ये पद्मविभूषण तर सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मार्च २०२३ मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत.आशाताईंना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते.
आशा भोसले आज त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र वयाच्या या टप्प्यावरही तितक्याच सक्रिय आणि चिरतरुण आहेत. त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्या दुबईमध्ये आज ‘आशा@90’ या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट करत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेकांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांचा फोटो ट्विटरवर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे , ‘आपल्या सुमधूर आवाजात विविध भाषांतील हजारो गीतांना अजरामर करणा-या तसेच असंख्य सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ गायिका आदरणीय आशा भोसले जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक खास मोठी पोस्ट शेअर करत आशाजींना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्विट मधून आपुलकी व्यक्त करत आशाताईंना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत,
पद्म विभूषण, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !’ असे ट्वीट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेअर केले आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही आपल्या स्टाईलने आशा ताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.