आज पहाटे उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को या देशात 6.8 तीव्रता असणाऱ्या शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले.आतापर्यंत मृतांचा आकडा वाढून ६३२ वर गेला आहे तर जखमींची संख्या ३०० च्या वर गेली आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.आता स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहे. मोरोक्कोतील माराकेश हे शहर भूकंपाचे केंद्र होते अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने दिलेल्या माहितीनुसार मोरोक्कोत आलेला हा भूकंप शंभर वर्षातील सर्वात मोठा भूकंप होता
पहाटे ०३ वाजून ४१ मोरोक्कोतील मारकेश आणि रबात या शहरांमध्ये भूकंप झाला आहे.आफ्रिकेतील १२० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि विनाशकारी भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपामुळं अनेक जून्या तसेच नव्या इमारती कोसळल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे भूकंपाचे धक्के बसताच घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली.
जवानांनी आतापर्यंत अनेक लोकांचे मृतदेह मलब्याच्या बाहेर काढले आहे. याशिवाय जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने इमारतींचा मलबा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय मोरोक्कोला आवश्यक ती मदत देण्यासाठी तयारीही मोदी यांनी दर्शवली आहे.