बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे. आज तो आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या फिटनेसबद्दल कायमच अक्षयला ओळखले जाते.
नुकताच आलेला ओह माय गॉड २ सोडता अक्षयचे एवढ्यात आलेले चित्रपट फारसे यश मिळवू शकले नव्हते. मात्र आजच्या खास दिवशी अक्षय कुमार याने त्याच्या चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट हे दिले आहे. यामुळे आता अक्षय कुमार याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. अक्षय कुमार याने वेलकम टू द जंगल (वेलकम 3) चा टीझर नुकताच रिलीज केला असून त्यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर केली आहे.
अक्षय कुमार याने टीझरचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज मी स्वत: ला आणि तुम्हाला हे मोठे गिफ्ट दिले आहे.
वेलकम 3 हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.अक्षय कुमार, यांच्यासह दिशा पटानी, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, सुनील शेट्टी, संजय दत्त, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, रवीना टंडन, किकू शारदा, अर्शद वारसी, तुषार कपूर, लारा दत्ता, मुकेश तिवारी, शारीब हाशिम, श्रेयस तळपदे, राहुल देव, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा अशी मोठी स्टारकास्ट ह्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.