आफ्रिकन देश मोरोक्को मध्ये रात्री उशिरा झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत जवळपास २००० लोकांना आपला जीव गमावावा लागला असून हजारो लोक जखमी आहेत. या प्रलयकारी भूकंपामुळे शेकडो कुटुंबांना बेघर होण्याची वेळी आली आहे.शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती.या घटनेने देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे मोरोक्कोमधील शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून मोरोक्कोच्या प्रमुख शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले आहे. या विनाशकारी भूकंपामुळे युनेस्कोच्या वारसा स्थळांचेही नुकसान झाले आहे.