श्री संत सेना महाराज हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचे समकालीन संत असून विठ्ठलाचे ते निस्सीम भक्त होते.
व्यवसायाने न्हावी असणारे संत सेना महाराज विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जात असत.
संत सेना महाराजांचा जन्म प्रयागराज (अलाहाबाद )जवळील जबलपूर जिल्ह्यातील विलासपूरच्या ऊमरीया गावाजवळ बांधवगड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देविदास पंत आणि आईचे नाव प्रेमकुंवर होते.
लहानपणापासूनच पूजाअर्चा, विठ्ठलावरची निस्सीम भक्ती हेच त्यांच्यावरील संस्कार होते. दररोजची विष्णुपूजा हा त्यांचा नित्यनेम होता.
संत सेना महाराजांनी अभंगवाणी रचलेली आहे.या अभंगगाथेत २५७ अभंग आहेत. यात विठ्ठलाचे वर्णन करणारे, नामाचे माहात्म्य सांगणारे, अनन्य भक्तीचे महत्त्व सांगणारे, कीर्तनाविषयीचे अभंग, परमेश्वराला विनवणी करणारे असे अनेक प्रकारचे अभंग आहेत.
संत जनाबाईंनी संत सेना महाराजांविषयी लिहिले आहे की ‘सतत नाम जपणारा , भक्तीत तल्लीन असणारा असा सेना न्हावी होता. त्याच्या भक्तीसाठी विठ्ठल न्हावी झाला ‘.
संत कबीर, संत मीराबाई, संत नरसी मेहता, संत गुरू नानक, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत निळोबा, मोरोपंत, या सर्वांनी आपापल्या अभंगात संत सेना महाराजांचा उल्लेख केलेला आढळतो.
श्रावण वद्य द्वादशी या दिवशी विठ्ठलाच्या या महान भक्ताने समाधी घेतली ..
या महान संताला त्रिवार वंदन. .
सौ. सुलभा बंगाळे,
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र