राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा यंदाच्या गणपतीउत्सवात होणार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे यावर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.