आपण अनेकवेळा रेल्वेने प्रवास करतो. अनेक जण अगदी नियमित रेल्वेने प्रवास करतात. पण जे नियमित रेल्वेने प्रवास करतात त्यांना आपल्या नेहमीच्या रेल्वे शिवाय आणि जे कधीतरी प्रवास करतात त्यांना नियमित रेल्वेच्या वेळा, त्याचे थांबे आणि प्रवासाचा मार्ग जाणून घेणे काहीसे अवघड होते. यासाठी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून www.irctc.co.in ही वेबसाईट चालवण्यात येते. ज्यावर आपण देशातील रेल्वेचे तिकीट, वेळा, मार्ग इत्यादी पाहू शकतो. पण हे तुलनेत जास्त वेळ घेणारे काम आहे. त्यामुळे घाईच्या वेळी रेल्वेच्या माहितीसाठी काय करायचं हा प्रश्न पडतो!
अशावेळी कोणते ॲप वापरावे?
प्ले स्टोअरवर अनेक ॲप उपलब्ध असतात, पण यातले रेल्वेचे खात्रीशीर ॲप कोणते असा प्रश्न पडतो. परंतु रेल्वेची माहिती देणारे एम इंडिकेटर हे ॲप आपल्याला देशभरातील रेल्वेच्या वेळा, रेल्वेचे मार्ग, जागा उपलब्ध आहे की नाही यासंबंधी माहिती देते. त्याचबरोबर या ॲप वर मुंबई, पुणे, बंगलोर यांसारख्या लोकल रेल्वेचे जाळे असलेल्या शहरातील लोकलच्या वेळा, त्यांची स्थिती, इत्यादी माहिती मिळते. सोबतच मेत्रोबद्दलही हे ॲप खरी माहिती पुरवते.