जगभरात आपल्याला कुठेही जायचे असल्यास आपल्या भारतीय असण्याची ओळख दर्शवणे अनिवार्य असते. आणि हीच भारतीयत्वाची ओळख आपल्याला पासपोर्ट देतं! हा पासपोर्ट घेऊन आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कायदेशीरदृष्ट्या फिरू शकतो, वास्तव्य करू शकतो! पण अनेकवेळा आपल्याला संधी असूनही आपण पासपोर्ट कसा काढायचा हे माहिती नसल्याने परदेश गमनापासून मुकतो! याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.
पासपोर्ट कसा काढायचा?
सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, गुणपत्र, आणि आपले आधार कार्ड, पॅन कार्ड ही प्राथमिक कागदपत्रे जवळ असल्याची खात्री करावी. त्यानंतर सरकारी संकेतस्थळ https://www.passportindia.gov.in या साईटवर जाऊन New User Registration वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन हे निश्चित करा. आणि पुढे आपली प्राथमिक माहिती भरा, त्यानंतर पालकांची माहिती, आपला पत्ता, आपला आपत्कालीन संपर्क अशी सर्व माहिती भरून शेवटी फी भरून आपल्याला सुयोग्य वाटणारी तारीख आणि वेळ निश्चित करा.
यानंतर आपण निवडलेल्या तारखेदिवाशी आपल्या निवडलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रावर जाऊन आपण भरलेल्या फॉर्मची पडताळणी करा. या प्रक्रियेनंतर तुम्हाला चारित्र्य पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. त्यावेळी पोलिसांना खरी माहिती आणि कागदपत्र द्या. यानंतर पुढील काही दिवसांत तुमचा पासपोर्ट तुमच्या पत्त्यावर पोहोच होईल.