विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी उद्या म्हणजे १३ सप्टेंबरला आयोजीत करण्यात आलेली आहे.विरोधकांच्या आघाडीच्या आता पर्यंत तीन बैठका पार पडल्या मात्र त्यात जागावाटपाबद्दल एकमत झालेले नाही.या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.तसेच आगामी निवडणूकीची रणनितीही ठरवली जाणार आहे.तसेच इंडिया आघाडीच्या लोगोबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच पाच शहरात रॅली काढण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
समन्वय समितीचे सदस्य –
केसी वेणू गोपाल काँग्रेस
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस
टीआर बालू डी एम के
संजय राऊत शिवसेना
तेजस्वी यादव आरजेडी
अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेस
राघव चड्ढा आम आदमी पक्ष
जावेद अली खान समाजवादी पार्टी
लल्लनसिंह जे डी यु
हेमंत सोरेन जे एम एम
डी राजा सीपीआय
ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स
मेहबूबा मुफ्ती पीडीपी