उत्तराखंड राज्यात हा बदल होत असून राज्य वक्फ मंडळाने याविषयीचा निर्णय दिला आहे. मार्च २०२४ मध्ये उत्तराखंडमध्ये हा बदल प्रत्यक्षात आलेला दिसून येईल असे सांगण्यात येत आहे.एनसीआरटीच्याअभ्यासक्रमानुसार मदरशातील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बदलासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येत आहे. हा बदल झाला तर इंग्रजी शाळांप्रमाणे मदरसे मॉडर्न बनतील अशी आशा राज्य वक्फ बोर्डाला वाटत आहे.
मॉर्डन मदरशांमध्ये संस्कृत ही भाषा पण शिकविण्यात येणार आहे.एनसीईआरटी अभ्यासक्रमात सर्वच विषय आहेत. त्यानुसार संस्कृत हा विषय आहे. केवळ संस्कृतच नाही तर इतर भाषा सुद्धा मॉर्डन मदरशांमध्ये शिकविण्यात येणार असल्याचे उत्तराखंड मधल्या वक्फ बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे इतर भाषांची माहिती पण मदरशांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे
उत्तराखंडमध्ये एकूण ११७ मदरसांना मॉर्डन करण्यात येणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात ४ मदरशांना मॉर्डन करण्यात येणार आहे. तसेच मदरशांना फर्निचरसह संगणक कक्ष आणि इतर मॉर्डन शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा देण्यात येणार आहे. हायटेक तंत्रज्ञानाचा वापर या मदरशांमध्ये करण्यात येणार आहे. आमुलाग्र बदल करण्याचा हा निर्णय राज्य वक्फ बोर्डाने घेतला आहे.