अरब देशातल्या लीबिया इथे डॅनियल वादळामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात तीव्र पाऊस आणि पूर आल्याने महापूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.या पूराचा सर्वाधिक फटका डेरना या शहराला बसला आहे. येथे ७०० लोक गाडले गेले आहेत तर मृतांचा आकडा खूप मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण या पूरात १०,००० लोक बेपत्ता आहेत. लीबियात झालेल्या भीषण पावसामुळे आलेल्या पूराने सगळीकडे पाणी भरले असून देशात आतापर्यंत ५,२०० हून अधिक मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीनंतर बांध फुटल्यामुळे पाण्याचे लोट वाहू लागल्याने लिबियातील अनेक शहरे जलमय झाली आहे. काही ठिकाणी तर भीषण परिस्थिती असून पाणी ओसरत नसल्यामुळे शेकडो मृतदेह हाती लागत नसल्याने बचाव यंत्रणांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
Tags: NULL