मसुरीच्या होम स्टे मध्ये २४ वर्षीय तरुणाच्या हत्येची पोलिसांकडून मंगळवारी उकल करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिल्ली स्थिती एका भाऊ-बहिणीला हरिद्वार येथून अटक केली आहे. कपिल चौधरीचे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये राहणाऱ्या कुदरत बाशर या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मागच्या दोन वर्षांपासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरु होतं. काही दिवसांपूर्वी कपिलने तुझ्याशी लग्न करता येणार नाही, असं कुदरतला सांगितलं. त्यासाठी त्याने धर्माच कारण दिलं. दोघांचे धर्म वेगळे होते. कुदरतच्या मनगटावर कपिलच्या नावाचा टॅटू होता. तिच त्याच्यावर भरपूर प्रेम होतं. कुदरतने कपिलला समजावण्याचा प्रयत्न केला. मी घरच्या सगळ्या गोष्टी संभाळून घेईन, असं तिने सांगितलं. पण कपिल तयार झाला नाही. यानंतर कुदरत आणि तिच्या भावाने कपिलला अद्दल घडवण्यासाठी कट रचत त्याची मसुरी मधल्या होम स्टे मध्ये हत्या केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले