भारतीय बनावटीचे कू हे ॲप्लिकेशन जगभरातील जवळपास १०० हून अधिक देशात वापरले जाते. हे ॲप्लिकेशन ट्विटरला टक्कर देणारे भारतीय ॲप्लिकेशन आहे. मेड इन इंडिया या संकल्पनेच्या माध्यमातून डिजिटल भारताला एका विशेष उंचीवर नेण्याचे काम या ॲप्लिकेशनने केलं आहे. या माध्यमावर जगभरातील अनेक अती महत्वाची मंडळी तर आहेतच परंतु स्थानिक भाषेत काम करणारे हे माध्यम जगभरातील जवळपास ५० कोटी लोक वापरतात! यातून भारताची तंत्रज्ञान विषयक प्रगती लक्षात येते. हे ॲप्लिकेशन जवळपास वीस हून अधिक भाषांमध्ये काम करते. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी माहिती किंवा पोस्ट या ॲप वर करता तेव्हा ते तुमच्या निवडीनुसर विविध भाषेत पोस्ट होते.
मार्च २०२० मध्ये कू ची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत जगभरात जवळपास ५० कोटीहून अधिक वापरकर्त्यांना हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढताना दिसते. सोबतच यावर व्यक्त होणाऱ्या मान्यवरांची संख्याही वाढताना दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे हे संपूर्ण भारतीय बनावटीचे असल्याने आपल्या मातीतले असल्याची भावना या ॲप मधून जाणवत असल्याने वापरकर्त्यांना हे ॲप सोयीस्कर वाटते.