घराबाहेर पडताना आपल्याला अनेक वेळा आपली महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगणं अनिवार्य असतं! ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना अशी महत्त्वाची कागदपत्रे येतात. कोरोना महामारी नंतर या कागदपत्रांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचा पुरावा देखील सोबत बाळगणे अनिवार्य झाले! परंतु ही सगळी कागदपत्रे सोबत बाळगणं सहज शक्य नसतं! अनेकदा ते हरवायची भीती असते, किंवा चोरीला जायची भीती असते. अशावेळी आपण नेमकं काय करायचं हा प्रश्न पडतो. अनेक वेळा आपण अशा कागदपत्रांचा फोटो काढून आपल्या सोबत ठेवतो; परंतु मोबाईल मधील फोटो हा सरकारी नियमानुसार नुसार ग्राह्य धरला जात नाही! अशावेळी काय करायचं? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केंद्र सरकारच्या परवानगीनुसार ग्राह्य धरण्यात येणारे सरकारी एप्लीकेशन म्हणजे डीजी लॉकर. हे लॉकर आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांना आपल्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवते. ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, शैक्षणिक कागदपत्रे त्याच सोबत इतर अनेक कागदपत्रांचा समावेश होतो. आपण जेव्हा सरकारी ठिकाणी या एप्लीकेशन मधील कागदपत्रे दाखवतो तेव्हा ते ग्राह्य धरले जाते, जसे आपल्याला वाहन चालवताना पोलिसांनी आपल्या लायसन्सची विचारणा केली असता आपण या ॲप्लिकेशन मध्ये जतन केलेले ड्रायव्हिंग लायसन दाखवू शकतो जे नियमाने ग्राह्य धरले जाते. त्याचबरोबर सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश घेताना आपले ओळखपत्र जिथे दाखवावे लागते त्या ठिकाणी या ॲप्लिकेशन मध्ये जतन करून ठेवलेले ओळखपत्र दाखवून आपण प्रवेश मिळवू शकतो!
त्यामुळे आता आपल्याला कोणतेही कागदपत्र मोबाईल मध्ये सहज जतन करून ठेवणे शक्य आहे. तेव्हा आजच हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा!