जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बुलढाणा इथे सकल मराठा समाजाकडून भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात महाविद्यालयीन तरुण तरुण मार्गदर्शन व आपली भूमिका मांडणार आहेत .या मोर्चाला ३० ते ३५ हजारांचा जनसमुदाय येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काळे कपडे घालून हजारो मोर्चेकरी यामध्ये सहभागी होणार आहेत.तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.