रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची रशियातील व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे भेट घेतली. किम जोंग उन हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांची भेट झालेले हे स्पेसपोर्ट रशियाच्या पूर्व अमूर भागात आहे.
किम जोंग उन त्यांच्या आलिशान खाजगी ट्रेनमधून रशियाला पोहोचले असून त्यांच्यासोबत नेते आणि काही लष्करी कमांडर यांच्यासोबत आर्म्स इंडस्ट्रीचे बडे अधिकारी देखील रशियाला गेल्याचे सांगण्यात येत आहे.किम जोंग मंगळवारी आपल्या खासगी ट्रेनमधून रशियातील व्लादिवोस्तोक शहरात पोहोचले.येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. किमसोबत त्याची बहीण किम यो जोंग देखील रशियाच्या दौऱ्यावर आल्या आहेत.
या दौऱ्यात किम जोंग उन आणि पुतीन यांच्या परस्परांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार असून.याशिवाय अमेरिकेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन्ही देश रणनीती बनवू शकतात अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने या बैठकीवर लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले आहे.